पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रामनाम आहे विश्वाची धून

     रामनाम   आहे   विश्वाची   धून रामाचा   गजर   श्वासाश्वासातून रामाचा   वावर   रोमारोमातून रामनाम   आहे   विश्वाची   धून श्रीराम   जयराम   जयजयराम राम   पाहतो   कृपादृष्टीने      तोच   ऐकतो   माझे   गा - हाणे राम   बोलतो   मंजुळ   बोली त्याचे   हसणे   जणू   चांदणे राम   प्रकाशे   चंद्रसूर्यातून तोच   तेवतो   ज्योतीज्योतीतून रामनाम   आहे   विश्वाची   धून रामावाचुन   काही   न   सुचते रामावाचुन   काही   न   रुचते कल्पतरू   सारखा   राम   हा इच्छा   करता   ते   ते   मिळते राम   उमलतो   ह्रदयातून राम   बिलगतो   मूल   होउन रामनाम   आहे   विश्वाची   धून डॅा . प्रमोद   बेजकर

तुझ्यासाठी

इमेज
 एक हळवा कोपरा आहे तुझ्यासाठी  सांज होता प्रार्थना आहे तुझ्यासाठी  एक दुलई आपली उबदार स्वप्नांची  अस्तराचा चंद्रमा आहे तुझ्यासाठी जो कुणाला सापडू शकणारही नाही  एक कप्पा आतला आहे तुझ्यासाठी  शुभ्र तेजस्वी निळाई झाक असलेला  एक तारा चमकला आहे तुझ्यासाठी नाव लाडाचे तुझे दररोज घेतो मी मी किती वेडाखुळा आहे तुझ्यासाठी  खूप काही आणले रानात गेल्यावर  गंधभरला मोगरा आहे तुझ्यासाठी सांग घालावा कसा मी बांध इच्छांना  पूर ह्रदयी दाटला आहे तुझ्यासाठी प्रमोद बेजकर