तुझ्यासाठी

 एक हळवा कोपरा आहे तुझ्यासाठी
 सांज होता प्रार्थना आहे तुझ्यासाठी 

एक दुलई आपली उबदार स्वप्नांची 
अस्तराचा चंद्रमा आहे तुझ्यासाठी

जो कुणाला सापडू शकणारही नाही 
एक कप्पा आतला आहे तुझ्यासाठी

 शुभ्र तेजस्वी निळाई झाक असलेला 
एक तारा चमकला आहे तुझ्यासाठी

नाव लाडाचे तुझे दररोज घेतो मी
मी किती वेडाखुळा आहे तुझ्यासाठी

 खूप काही आणले रानात गेल्यावर
 गंधभरला मोगरा आहे तुझ्यासाठी

सांग घालावा कसा मी बांध इच्छांना 
पूर ह्रदयी दाटला आहे तुझ्यासाठी

प्रमोद बेजकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Reकामा

आपण

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही