रामनाम आहे विश्वाची धून

    रामनाम आहे विश्वाची धून

रामाचा गजर श्वासाश्वासातून

रामाचा वावर रोमारोमातून

रामनाम आहे विश्वाची धून

श्रीराम जयराम जयजयराम


राम पाहतो कृपादृष्टीने    

तोच ऐकतो माझे गा-हाणे

राम बोलतो मंजुळ बोली

त्याचे हसणे जणू चांदणे

राम प्रकाशे चंद्रसूर्यातून

तोच तेवतो ज्योतीज्योतीतून

रामनाम आहे विश्वाची धून


रामावाचुन काही  सुचते

रामावाचुन काही  रुचते

कल्पतरू सारखा राम हा

इच्छा करता ते ते मिळते

राम उमलतो ह्रदयातून

राम बिलगतो मूल होउन

रामनाम आहे विश्वाची धून

डॅा.प्रमोद बेजकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Reकामा

आपण

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही