Reकामा

 मी ब्लॅाग लिहिणारे’ मी जरा उत्साहात नन्याला म्हणालो.खरंतर नन्या हा काही उत्साहाने ज्याला सांगावं असा प्राणी नाही.कुठल्याही फुग्याला टाचणी लावून त्यातली हवा जाताना पहाण्यात त्याला आसुरी की काय म्हणतात तसा आनंद होतो.पण काही लोकांना टाचणी लावून घ्यायला आवडतअसावं..माझ्यासारखं.

कशाला हा उद्योग,आणि महत्वाचं म्हणजे कोण वाचणार तुझं खरडलेलं’ नन्याने हातात टाचणी घेतलीचत्याची चांगली खरडपट्टी काढावी असं मला वाटायला लागलं होतं.पण आपलं काहीही ऐकून घेणारा आणि भावी ब्लॅागचा ‘कदाचित एकमेववाचक मला गमवायचा नव्हता.

अरे , आता भरपूर वेळ आहे,म्हणून...’ माझं वाक्य अर्ध्यात तोडत तो म्हणाला,’म्हणजे तुला काहीउद्योग नाही,म्हणून तू लोकांना कामाला लावणार का वाचायच्या?त्यापेक्षा भिंतीला तुंबड्या लाव. तुला माहिती आहेच ना,रिकामा न्हावी भिंतीला तुंबल्याने लावी.नाहीतरी पूर्वी न्हावी लोकच सर्जन म्हणून काम करायचे.तू सर्जन नसलास तरी physician and surgeon लावतोय नावापुढे,त्यामुळे तुंबड्या लावायचा तुला हक्कच आहे,अगदी बाकायदा.’

तुला काही सांगण्यात अर्थ नाही.अरे सर्जनशीलता तुला काय कळणार,त्यादृष्टीने तरी मी सर्जनआहे.’

‘ ओह,असं का???मग तुमच्या विचारांची कात्री आमच्या डोक्यावर चालवून आमची रोज कटिंग करायचा विचार आहे का?’

‘खरंतर तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही,पण दुसरं कोणीच माझं ऐकत नाही,म्हणून मी तुला हे सांगतोय.आणि आमच्या टॅामीला सांगण्यापेक्षा तुला सांगणं बरं हाही विचार आहेच.’

टॅामीबरोबर बसवल्यामुळे स्वारी चांगलीच खवळली. ‘ हे तुझे असले फालतू विचार आणि तू ते मोठाआव आणून ब्लॅागच्या नावाने लोकांच्या माथी मारायचा प्रयत्न करणार.लोक अर्थात इतके मूर्ख नसतात.कोणी ढुंकून बघणार नाही तुझ्या ब्लॅागकडे.’अशी जवळजवळ शापवाणी उच्चारून नन्या तरातरा जायला निघाला.तरी जाता जाता माझ्या टाळक्यात त्याने एक वाक्य हाणलंच.’ बोलणा-याचं तोंड धरतां येत नाही,तसं ब्लॅाग लिहिणा-याचा हात धरता येत नाही,लिही बाबा लिही काय पाहिजे ते.’

प्रमोद बेजकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही