उत्सव

तू भेटतेस तेव्हा उत्सव होतो रोमरोमातून 
लखलखून जातो देहाचा मंडप 
उजळतो चेहरा हसण्याच्या निआॅन लाईटने
 आठवणी लगबगतात इथे तिथे नटून सजून
 ह्रदयाचा जनरेटर धडधडू लागतो 
आत गाणं जोरात वाजू लागतं..
 तुम  मिले,गुल खिले और जीने को क्या चाहिये 

 मी तुझ्याबरोबर चालतो विहरल्यागत
 मी स्वत:लाच वाटतो बहरल्यागत
 सहेतुक,निर्हेतुक स्पर्श करतात अधिकच उत्सवी,
 अनेक मोहक शक्यतांची वर्दळ वाढते 
गदारोळात ऐकू येत नाही तुझा शब्द
 मनाचा लाऊडस्पीकर ओरडत राहतो
 तू हवीस...तूच हवीस 
 तेवढ्यातच 
संयमाचा पोलीस काठी आपटत येतो 
‘आवरा,आवरा, वेळ संपत आलीये’ 
तुझा हात निसटतो स्वप्निल धुक्यातून
 व्यावहारिक रस्त्यावर येते संभाषणाची गाडी
 उत्सव संपतो,मंडप पुन्हा काळोखतो 
सारं होतं शांत शांत
 तरीही आतून प्रचंड अशांत 

      डाॅ. प्रमोद बेजकर






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Reकामा

आपण

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही