रामनाम आहे विश्वाची धून
रामनाम आहे विश्वाची धून रामाचा गजर श्वासाश्वासातून रामाचा वावर रोमारोमातून रामनाम आहे विश्वाची धून श्रीराम जयराम जयजयराम राम पाहतो कृपादृष्टीने तोच ऐकतो माझे गा - हाणे राम बोलतो मंजुळ बोली त्याचे हसणे जणू चांदणे राम प्रकाशे चंद्रसूर्यातून तोच तेवतो ज्योतीज्योतीतून रामनाम आहे विश्वाची धून रामावाचुन काही न सुचते रामावाचुन काही न रुचते कल्पतरू सारखा राम हा इच्छा करता ते ते मिळते राम उमलतो ह्रदयातून राम बिलगतो मूल होउन रामनाम आहे विश्वाची धून डॅा . प्रमोद बेजकर