पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही  खूप अजुनी दंश ओले चंदनाच्या शुभ्र देही  खूप काही बोलताना खूप उरले मौन ओठी  गंधलेल्या त्या क्षणांची पाकळी उरली न देठी  खूप काही तू दिलेले घेतले नाही तरी मी   खूप जागी उसवलेली एक झोळी भरजरी मी  खूप वेळा तोल जावा,सावरावे पण कशाला   मोकळे झाल्याविणा का स्पर्श होतो चांदण्याला  खूप काही रुजत जावो,मी जरी खडकाळलेलो  मी दुभंगावे असे की मी जणू मातीस स्फुरलो   खूप काही खुपत राही,त्या कदाचित स्वप्नकाचा  पाय अडवी सारखा तो उंबरा असतो मनाचा  खूप आहे मी मनस्वी,खूप देहस्वी जशी तू   भान विसरुन शरण जातो,रोज घे माझा बळी तू   खूप आहे खूप नाही,कर वजाबाकी हवी तर  पान कोरे शेवटाला,तू हवे ते मांड उत्तर  प्रमोद बेजकर

हिंदी गजल

इमेज
ख्वाब रोशन है उस की झिलमिल से  कैसे कह दे मगर ये संगदिल से  बात होती है बस यहा लब से  कोई कहता नही है कुछ दिल से  ऐसी राहत न अबतलक थी कभी  जैसी पायी है आज कातिल से  रब को ढूंढू तो मै कहा ढूंढू  आदमी ही मिला है मुश्किल से  प्यार है चाह,थोडी नफरत भी  ये है रिश्ता हमारा मंझिल से  वो निशां ना मिटाये तेरा कभी  और उम्मीद कुछ न साहिल से  दिल तो बहला,मगर दिमाग कहे  उठ ही जाना है तुझ को मेहफिल से   प्रमोद बेजकर

गुलजार….Migrant…Covid 19

इमेज
स्थलांतरीत मजूरांवर ‘गुलजार’ यांनी लिहिलेली ही कविता मी स्वरबद्ध केली आहे. जरूर ऐका. अजब अंदाज से अब के खिजा आयी है वतन मे गिरे है पेडों की शाखो से सूखे हुए पत्ते हवा ने खूब बिखराया, उडाया अब के चमन मे गुलजार….Migrant…Covid 19

मिलना तो तय है ...My song, written and composed by me, and sung by, Mithilesh Patankar

इमेज
मिलना तो तय है,आज नही तो कल  दिल मे उजाले है यादों के झिलमिलते है पल... चकरा का चकरा का चक  दीवानों को उम्र की सीमा कैसे रोकेगी?  अपनी शरारत और बचपना देख वो हस लेगी  कुछ पन्ने कॅलेंडर के ना कभी पुराने है  दिल मे छुपा के रख्खे वो अनमोल खजाने है दिन वो सुहाने,याद जो आये दिल मे है हलचल.. चकरा का चकरा का चक  कहां कहां से आये थे हम कहां कहां पहुचे  फिर भी दोस्ती,भाईचारा कभी न हम भूले  मिलते है तब जश्न हमारा महफिल रंगीली  जैसे खुशियों की परिया है अपनी हमजोली  जान है जब तक यहां मिलेंगे,मिलेंगे फिर उपर... चकरा का चकरा का चक  डॅा.प्रमोद बेजकर

एक गाणं

इमेज
मी विसरतो विसरायचे,तेव्हाच आठवतेस तू  करतो वजा सा-यातुनी थोडी तरी उरतेस तू   वाळूतल्या सा-या खुणा,वाहून गेल्या सागरी  मागे न काही राहिले, बघतोच वळुनी मी तरी  कोजागिरीचा चंद्रही, येऊन मालवतेस तू.....  हातातला तू कवडसा,निसटून गेलेला पुन्हा  तू मृगजळाचा वायदा,माझ्या तहानेला पुन्हा  असतेस तू नसतेस तू, गुंता असा करतेस तू...  भलताच नाही हट्ट हा,भलतेच नाही मागणे  रात्रीस एकांती कधी तू माळ माझे चांदणे  आहे शहाणा मी तरी,वेडा खुळा म्हणतेस तू...  श्वासात तू,गात्रात तू, अस्तित्व हे झाले तुझे  आक्रोश हा पेशीतुनी, तू पाहिजे तू पाहिजे  ह्रदयातही ठोका तुझा, डोळ्यातुनी झरतेस तू...  करतो वजा सा -यातुनी थोडी तरी उरतेस तू  प्रमोद बेजकर

उत्सव

इमेज
तू भेटतेस तेव्हा उत्सव होतो रोमरोमातून  लखलखून जातो देहाचा मंडप  उजळतो चेहरा हसण्याच्या निआॅन लाईटने  आठवणी लगबगतात इथे तिथे नटून सजून  ह्रदयाचा जनरेटर धडधडू लागतो  आत गाणं जोरात वाजू लागतं..  तुम  मिले,गुल खिले और जीने को क्या चाहिये   मी तुझ्याबरोबर चालतो विहरल्यागत  मी स्वत:लाच वाटतो बहरल्यागत  सहेतुक,निर्हेतुक स्पर्श करतात अधिकच उत्सवी,  अनेक मोहक शक्यतांची वर्दळ वाढते  गदारोळात ऐकू येत नाही तुझा शब्द  मनाचा लाऊडस्पीकर ओरडत राहतो  तू हवीस...तूच हवीस   तेवढ्यातच  संयमाचा पोलीस काठी आपटत येतो  ‘आवरा,आवरा, वेळ संपत आलीये’  तुझा हात निसटतो स्वप्निल धुक्यातून  व्यावहारिक रस्त्यावर येते संभाषणाची गाडी  उत्सव संपतो,मंडप पुन्हा काळोखतो  सारं होतं शांत शांत  तरीही आतून प्रचंड अशांत        डाॅ. प्रमोद बेजकर

नवीन वर्षाच्या (फुकटच्या) शुभेच्छा (वेळ असेल तर वाचा,नाहीतर नुस्तंच👍 करा😃

नवीन वर्षाची सकाळ उजाडली. दरवर्षीप्रमाणे,चार दिवसातच गारठून जाणारा, मॉर्निंग वॉकला जायचा संकल्प मी आदल्या रात्रीच सोडला होता.हा सोडण्यासाठीच सोडलेला मूर्खासारखा संकल्प मला उबदार दुलईत मस्तपैकी झोपूही देईना.त्यामुळे डोळ्यात झोप मावत नव्हती तरी मी नवजात संकल्पाचा मान राखण्यासाठी,धडपडत घराबाहेर पडलो,तर समोरून नन्या.माधुरी दिक्षितमुळे फ़ेमस झालेल्या नेने या नावाचं नेन्या आणि नंतर जिभेच्या निव्वळ आळसामुळे आम्ही मित्रांनी नन्या केलेला आता डोक्यावर बाल नसलेला बालमित्र.  नन्याचं ध्यान नेहमीसारखंच दिसत होतं.म्हणजे त्याच्या बावळटपणात भर घालणारी त्याची ती कानटोपी,शांताबाई शेळक्यांना,’ही चाल तुरूतुरू’ ही ओळ नन्याला बघून सुचली असावी असं वाटायला लावणारी त्याची तुरूतुरू चाल,आणि वा-यावर फ़डकत राहणारा त्याचा तो लेंगा.लेंगा घालून मॉर्निंग वॉक करणारा म्हणून नन्या प्रसिद्धच आहे.पण त्यालाही त्याचा तसा नाईलाजच.लहानपणी पुस्तकात वाचलेलं,’लेंगे स्वराज्य लेंगे’ ही घोषणा आणि प्रभात फ़ेरी यांचं समीकरण जे बालनन्याच्या डोक्यात बसलं,ते मोठा झाल्यावर गणितातलं बाकी सारं विसरलं तरी तसंच कायम आहे. तर अशा य...

आपण

कधी वरती,कधी खाली, तरी तिथल्या तिथे आपण  जणू की ट्रेन स्टेशनचे सरकणारे जिने आपण  कशाला उंच माणुस बघत बसतो,झाक तू डोळे  तुला कळणार नाही मग,किती आहो खुजे आपण  कशाला खुमखुमी येते कुणाला युद्ध करण्याची  अमुक मेले,तमुक जखमी असे मग आकडे आपण  तुझ्या शब्दात सा-या जाळ कोठुन आणशी इतका  खरेतर फार पूर्वी विझुन गेलेले दिवे आपण  सरळ आहोत,साधे सरळ आहे वागणे सगळे  जिथे जातो तिथे होतो कसे पण आडवे आपण   तसाही ताल नाही चुकत थोडाही तुझा माझा  समेवरती तरी का येत नाही छानसे आपण   कुठे गुंतून नाही जायचे हे ठरवले होते  तरी गुंते किती करतोच आहो सारखे आपण  शहाण्यांच्या मताला ‘जाऊ दे खड्ड्यात’ म्हणतो…पण  खुळ्यांनाही कशाने वाटतो भलते खुळे आपण  रवी घेऊन घुसळे काळ,सारे दिवस अन रात्री  जणू चोथाच जगणे अन क्षणिकसे बुडबुडे आपण  नको निष्कर्ष काढू सारखा प्रत्येक गोष्टीचा  इसापाच्या कथेचे सिंह,कोल्हे,ना ससे आपण  डॅा.प्रमोद बेजकर

Reकामा

इमेज
‘  मी   ब्लॅाग   लिहिणारे ’  मी   जरा   उत्साहात   नन्याला   म्हणालो . खरंतर   नन्या   हा   काही   उत्साहाने   ज्याला सांगावं   असा   प्राणी   नाही . कुठल्याही   फुग्याला   टाचणी   लावून   त्यातली   हवा   जाताना   पहाण्यात   त्याला आसुरी   की   काय   म्हणतात   तसा   आनंद   होतो . पण   काही   लोकांना   टाचणी   लावून   घ्यायला   आवडत असावं .. माझ्यासारखं . ‘ कशाला   हा   उद्योग , आणि   महत्वाचं   म्हणजे   कोण   वाचणार   तुझं   खरडलेलं ’  नन्याने   हातात   टाचणी घेतलीच .  त्याची   चांगली   खरडपट्टी   काढावी   असं   मला   वाटायला   लागलं   होतं . पण   आपलं   काहीही ऐकून घेणारा  आणि   भावी   ब्लॅागचा  ‘ कदाचित   एकमेव ’ वाचक   मला   गमवायचा   नव्हता . ‘ अर...